Monday, April 1, 2013

मृत्यु

"इतुकेच मला जाताना सरणावर कळले होते,
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते।"
- सुरेश भट

वाह, क्या बात हैं। ह्याशिवाय दूसरी कोणती दाद देउच शकत नाही अश्या ह्या ओळी. काय भन्नाट लिहून गेलाय हा माणूस. झबर्दस्त....

तसे बघितले तर मृत्युकडे नेहमी भितीच्याच नजरेने बघितले जाते, पण ह्या ओळी काही वेगळेच सांगून जातात आणि कितीही नाही म्हटले तरी ह्या ओळी १००% पटतात. का पटू नयेत? सगळ्या त्रासातून मुक्ती देणारा तो मृत्यु, सगळ्या पिडांचा, वेदनांचा शेवट तो मृत्यु. ना ऑफिस चे टेंशन, ना ट्राफिकची चिंता, ना पैशाचे दडपण, ना जागेची अडचण. तब्ब्येतिची काहिएक काळजी नाही, लोकांशी पटत नाही, माझ्या भावना कोणीही समजून घेत नाही अशी तक्रार राहात नाही, जातिभेद, वर्णभेद, प्रान्तिकभेद, भाषाभेद काही म्हणून काही भेद नाही. मृत्युला सगळे सारखेच. एक समान.

बऱ्याच कवींना ह्या गूढ़ प्राण्याचे प्रचंड आकर्षण वाटले आहे. भाऊसाहेब पाटणकर म्हणतात-
"कफ़न माझे दूर करूनी, पाहिले मी बाजुला
एकही आसू कुणाच्या डोळ्यात ना मी पाहिला
बघुनी हे माझेच आसू, धावले गालावरी
जन्मभर हासूनही मी, रडलो असा मेल्यावारी"

आणि म्हणुनच मला वाटते की बोले तैसा चालणारा, माणसाला माणूस बनवून ठेवणारा तो मृत्यु कितीही भीषण वाटला तरीही तो तितकाच खरा मित्र पण आहे...

सरळ साधे http://mymarathiwork.blogspot.com/

No comments:

Post a Comment