Monday, April 22, 2013

लाज

माझी मलाच आता लाज वाटते आहे,
पेटून उठणे आता माझे रक्त विसरले आहे...

अजुनी धगधगणाऱ्या चितांवर हळहळतो मी,
दुसऱ्याच क्षणी मग माझा, माझ्यातच गुरफटतो मी...

जगण्याचे खोटे-खोटे इमले चढवतो मी,
दुसऱ्यांच्या दुःखावरती सुख आपले बांधतो मी...

दुसऱ्यांच्या रण-संग्रमाशी माझे देणे-घेणे नाही,
बातम्या बघताना खवळतो, पण मी रस्त्यात उतरत नाही...

माझी मलाच आता लाज वाटते आहे,
पेटून उठणे आता माझे रक्त विसरले आहे...

Tuesday, April 16, 2013

चिमुरडे कुरिअर

(ओ हेन्रीच्या By Courier ह्या कथेपासून प्रेरित)

भर दुपारच्या वेळी त्या बागेत तशी जास्त माणसे नसत. आजही नव्हती. तो अणि त्याचे थोडेफार सामान सकाळपासून त्याच हिरव्यागार झाडाच्या सावलीत विराजमान होते. आणि त्याची नजर तेथुनच बरोब्बर पन्नासेक कदमांवर असलेल्या दुसऱ्या झाडाखाली बसलेल्या, कुठेतरी शुन्यात हरवलेल्या त्या तरुणीकडे होते. एखादे सुंदर चित्र जणू जिवंत होउन त्या झाडाखाली बसले होते. तिचा श्वास चालु होता; पण बाकी जिवंतपणाची कोणतीही खुण तिथे नव्हती. त्याला तिच्याशिवाय काहीही दिसत नव्हते. दुपारच्या उन्हाच्या झळा जणू त्याला जाणवतच नव्हत्या.

एक क्षणभरच त्याची नजर समोर गेली अणि त्याला काही छोटी बच्चेकंपनी घसरगुंडीवर धुडगुस घालताना दिसली, त्याच भर उन्हात. त्याला अचानक काहीतरी सुचले अणि त्याने त्यातल्याच एका स्मार्ट चिमुरडयाला जवळ बोलावले.
नुकतेच बोलू लागलेला तो पोपट त्याच्यासमोर येउन उभा राहिला. मस्त हात पाठीमागे दुमडून वाट बघू लागला तो काय सांगतो ह्याची...
तो म्हणाला, "मित्रा माझे एक काम करणार का?"
"हो, करेन की"
"ठीक आहे. तुला त्या तिथे बसलेल्या मुलीला एक निरोप द्यायचा आहे. देणार न?"
"हम्म. देईन की"
"तिला सांग की तुला वचन दिल्याप्रमाणे मी तुला ना पत्र लिहित आहे ना ईमेल करत आहे, की फोन करत आहे ना एस एम् एस करत आहे. पण राहवत नाही म्हणून ह्या चिमुरड्या कुरिअरचा वापर करत आहे. आज रात्रीच्या गाडीने मी परत चाललो आहे, कायमचा... परत कधीही न भेटण्यासाठी. मला माहीत होते की आज तू मला ह्या बागेतच भेटशील. आपल्या नेहमीच्या जागी. म्हणुनच मी तुझी सकाळपासून वाट बघत आहे. मला तुला फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे. माझ्याकडून अशी काय चूक झाली की तू मला भेटायचेच काय पण बोलायचेसुद्धा सोडून दिलेस? अशी कोणती गोष्ट आहे ज्यामुळे तू मला असे बेदखल केले आहेस आपल्या आयुष्यातून?? असे केले काय आहे मी?...... जा आता आणि हे सगळे सांग तिला. सांगशील ना हे सगळे? खुप महत्वाचे आहे हे सगळे. माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे."
असे सांगून त्याने त्या चिमुराड्याच्या हातात एक चाँकलेटची लादी ठेवली.
आपल्या चिमुराडयाने एका हाताने चड्डी सावरत, दुसऱ्या हाताने ती लादी आपल्या खिशात सारली. आणि तो म्हणाला, "हो सांगेन ना दादा हे सगळे."

आता तो कोणत्यातरी सिक्रेट मिशनवर निघालेल्या एजंटसारखा त्या मुलीच्या दिशेने निघाला.
"ए ताई, मला त्या तिथल्या दादाला तुला एक निरोप दिलेला आहे."
त्या मुलीने त्या चिमुरड्याकडे क्षणभर पाहिले आणि ती, त्या क्षणी परत पृथ्वीवर आली. त्या अर्ध्या चड्डितल्या मुलाकडे पाहून तिचे कुतूहल जागे झाले. ती म्हणाली, "जी कहिए छोटे नवाब, क्या केहना है आपका?" त्या चिमुकल्याच्या चेहऱ्यावर क्षणभरच प्रश्नचिन्ह उमटले. पण क्षणभरच. त्याला वाटले नव्हते की आपल्याला हिन्दी बोलावे लागणार आहे. पण तो स्वतःला सावरून उत्तरला," दीदी, वो उधर बैठेले जो भैया है ना उन्होंने तुम्हारे लिए एक निरोप दिएला है।" त्या मुलीची नजर एक सेकंदासाठी त्याच्याकडे गेली. पण ती काहीही बोलण्याआधी तो छोटू म्हणाला,"उसने कहा है के उसका निरोप बहुत महत्व का है। उसके जीवन मरण का है। तुम्हारे कहने के से वो ना तो तुम्हारेको फोन करा है, ना और कुछ। पर मैं है न उसका कुरी - कुरी - कुरी कुछ कुछ सा है। हा हा कुरियर कुरियर। तो ये रहा उसका निरोप... - आज मेरी शाम की गाडी है और मैं जा रहेला है, कायमचा।" चिंटुकल्याची चड्डी थोडी थोडी घसरत होती म्हणून त्याने येथे एक छोटासा पॉज़ घेतला. त्या अवस्थेतसुद्धा तिला त्या चिमुकल्या कुरिअरची मजा वाटली. "हाँ जी और क्या क्या कहा है उन्होंने?".
"हाँ और, मेरेको पता था के तुम मेरेको इधरिच मिलेगा इसलिए मैं सुबह से इस बाग में बैठेला है। तुम्हारी वाट देख रहेला है। तुम मेरेको इधरिच मिलते थे ना इसलिए...।" परत एक विश्रांती. "तो मेरेको तुमसे एक प्रश्न पुछ्नेका हैे। येही के मैंने ऐसा क्या किया जो तुम मेरेको छोड़ दिया? मेरेसे बात तो करनेका ना यार। मेने ऐसा क्या कियेला है जो तुम मेरेसे इतना दूर गयी है? अपुन तेरेको प्यार करता है ना यार" हात हवेत फिरवत त्याने स्वतःचीही थोडी भर घातली.

ती मंद हसत म्हणाली," जनाब आप तो बहोत ही प्यारे कुरिअर हो। पर उन्हें केहना के हमने जब आप को उस सुमेधा के साथ स्विमिंग पूल के किनारे जो भी कुछ करते हुए देखा, उसके बाद हम आपकी असलियत समझ गए है। और उस घटना के बाद हमे नहीं लगता के आप से बात करनी जरूरी है। हमारी आपसे यह उम्मीद नहीं थी। आपने जो हमारे साथ किया है, उसके बाद आप हमसे बात करनेकी उम्मीद भी कैसे रख सकते है? आप जा रहे है इस बात का हमे दुख तो जरूर है परन्तु आप के चंगुल से बचनेकी ख़ुशी उससे कई गुना ज्यादा है। छोटे नवाब जाइये और यह सब बातें उन जनाब को बता दीजिए। आप को समझा मैंने क्या क्या कहा वो? याद रहेगा ना?"
"हा हा क्यों नही? बिनधास बता देता मैं।"

तर अशा प्रकारे आपली कामगिरी यशस्वीरित्या पार पाडून छोटा शिलेदार पुन्हा त्याच्याकडे परत आला. त्याला ती ताई आवडली. गोड वाटली. जसा तो दादा आवडला होता. म्हणुनच तर त्याचे हे काम त्याने केले होते. इकडे तो त्याच्या चिमुरड्या कुरिअरची  खुप आतुरतेने वात बघत होता. तिचे आपल्या कुरिअर बरोबर काहीतरी बोलणे चालु होते हे त्याला दिसले होते. जरी त्याने त्या दोघांकडे जरी एकटक लक्ष ठेवले नव्हते तरी त्याचे सगळे ध्यान त्यांच्याकडेच होते. "दादा, ती बोलली माझ्याशी." "काय म्हणाली ती? पट्कन सांग." तो आतुरतेने म्हणाला. "ती म्हणाली की ती तुला चांगलेच ओळखून आहे. तू काहीतरी करत होतास म्हणे कोणा सुलेखाबरोबर. स्विमिंग पूलजवळ. ते बघितले आहे तिने. असे काय करत होतास रे तू दादा? ती म्हणाली की जे तिने बघितले ते बघितल्यावर बोलण्याची काही गरज नाही. काय असलियत का काहीतरी कळलॆ आहे तिला. अणि तू जात आहेस ते बरेच आहे म्हणे. अणि काय तरी चंगुल वगैरे बच गई असे म्हणाली ती."

सुलेखा, स्विमिंग पूल हे शब्द ऐकून त्याच्या ओठांवर हसू उमटले. एखाद्या डोंगरा एव्हड्या संकटाचे उत्तर छोटुश्या उंदराएव्हडे निघावे असे वाटू लागले त्याला वाटू लागले. आशेचा एक किरण दिसू लागला. त्याने त्या चिमुरड्याला विचारले, "दोस्ता अजून फक्त एकच काम करणार का? हे शेवटचे."
"हो करेन ना" का कोणास ठावूक पण आता त्या चिमुरड्याला पण कळत होते की तो कोणती तरी महत्वाची भूमिका पार पाडत आहे आणि ही कामगिरी घसरगुंडीवर हुन्दडण्यापेक्षा मजेदार आहे.
"हे पत्र घे अणि तिला हे सांग- मी समजू शकतो तुला काय वाटले असेल तेव्हा. हा कागद वाच अणि तुझा निर्णय ह्या चिमुकल्या कुरिअरकडे दे."

काय असेल बरे ह्या पत्रात हा विचार करत करत आपला चिंटू परत त्या मुलीकडे जाऊन पोचला. ह्या वेळी त्याला काही बक्षिसाचे ध्यान राहिले नाही. नाही म्हटले तरी तिचे लक्ष त्या दोघांकडे होतेच.

पुन्हा हा छोटू तिच्यासमोर उभा राहिला. ती म्हणाली, " बोलिए". "वो भैया ने ये दिया है और कहा है के उसको समझ सकता है के तुम ऐसा क्यों कर रही हो। और तुम्हे जो भी करना है वो मुझे बताना"

तिने तो कागद उघडला. ते एक सर्टिफिकेट होते.

Dear Mr. Kulkarni,

We would like to thank you from bottom of our heart for saving life of Ms. Sulekha on 5th Sept 2012. It was your presence of mind and first-aid (CPR) that has saved a precious life.

We sincerely appreciate and salute your bravery and would like to announce that you will be a life long platinum member of our club.

Thanks and warm regards,
Swimming Pool Administration

छोटू बघत होता की त्या मुलीच्या गालावरून हळुहळु अश्रु ओघळु लागले होते. तिच्या तोंडून एकही शब्द निघत नव्हता. तो म्हणाला,"क्या बोलनेका है उस भैया को?". ती आपले डोळे पुसतपुसत कसेबसे म्हणाली,"उन्हें कहना, हमे बस आपकी जरूरत है....।"

सरळ साधे http://mymarathiwork.blogspot.com/

Tuesday, April 2, 2013

Cultural Shift

Its true that we are moving away from culture of 'Character' to culture of 'Personality'.
Instead of internal beauty people are impressed by external features. By dictionary meaning character means- inherent attributes that determine person's moral and ethical actions and reactions (i.e something that comes from within). And character means personal attractiveness and interestingness that enables one to influence others (i.e. something that is superficial)
Hence now a days number of people following rock stars, actors, charismatic leaders, good looking sales men/women, personality development gurus is increasing exponentially. I am not saying these personalities don't possess any character, but they are not followed because of their character but because of their personality! E.g. Bollywood actors. How many of us follow them because of their value system? If we were, Salmaan Khan wouldn't have had such a great fan following after his hit and run case! If you have a look at the events around us you would realize that this is actually happening. We have started disrespecting values and overrespecting character. The value of values is decreasing day by day.

Monday, April 1, 2013

मृत्यु

"इतुकेच मला जाताना सरणावर कळले होते,
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते।"
- सुरेश भट

वाह, क्या बात हैं। ह्याशिवाय दूसरी कोणती दाद देउच शकत नाही अश्या ह्या ओळी. काय भन्नाट लिहून गेलाय हा माणूस. झबर्दस्त....

तसे बघितले तर मृत्युकडे नेहमी भितीच्याच नजरेने बघितले जाते, पण ह्या ओळी काही वेगळेच सांगून जातात आणि कितीही नाही म्हटले तरी ह्या ओळी १००% पटतात. का पटू नयेत? सगळ्या त्रासातून मुक्ती देणारा तो मृत्यु, सगळ्या पिडांचा, वेदनांचा शेवट तो मृत्यु. ना ऑफिस चे टेंशन, ना ट्राफिकची चिंता, ना पैशाचे दडपण, ना जागेची अडचण. तब्ब्येतिची काहिएक काळजी नाही, लोकांशी पटत नाही, माझ्या भावना कोणीही समजून घेत नाही अशी तक्रार राहात नाही, जातिभेद, वर्णभेद, प्रान्तिकभेद, भाषाभेद काही म्हणून काही भेद नाही. मृत्युला सगळे सारखेच. एक समान.

बऱ्याच कवींना ह्या गूढ़ प्राण्याचे प्रचंड आकर्षण वाटले आहे. भाऊसाहेब पाटणकर म्हणतात-
"कफ़न माझे दूर करूनी, पाहिले मी बाजुला
एकही आसू कुणाच्या डोळ्यात ना मी पाहिला
बघुनी हे माझेच आसू, धावले गालावरी
जन्मभर हासूनही मी, रडलो असा मेल्यावारी"

आणि म्हणुनच मला वाटते की बोले तैसा चालणारा, माणसाला माणूस बनवून ठेवणारा तो मृत्यु कितीही भीषण वाटला तरीही तो तितकाच खरा मित्र पण आहे...

सरळ साधे http://mymarathiwork.blogspot.com/