Monday, April 1, 2013

मृत्यु

"इतुकेच मला जाताना सरणावर कळले होते,
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते।"
- सुरेश भट

वाह, क्या बात हैं। ह्याशिवाय दूसरी कोणती दाद देउच शकत नाही अश्या ह्या ओळी. काय भन्नाट लिहून गेलाय हा माणूस. झबर्दस्त....

तसे बघितले तर मृत्युकडे नेहमी भितीच्याच नजरेने बघितले जाते, पण ह्या ओळी काही वेगळेच सांगून जातात आणि कितीही नाही म्हटले तरी ह्या ओळी १००% पटतात. का पटू नयेत? सगळ्या त्रासातून मुक्ती देणारा तो मृत्यु, सगळ्या पिडांचा, वेदनांचा शेवट तो मृत्यु. ना ऑफिस चे टेंशन, ना ट्राफिकची चिंता, ना पैशाचे दडपण, ना जागेची अडचण. तब्ब्येतिची काहिएक काळजी नाही, लोकांशी पटत नाही, माझ्या भावना कोणीही समजून घेत नाही अशी तक्रार राहात नाही, जातिभेद, वर्णभेद, प्रान्तिकभेद, भाषाभेद काही म्हणून काही भेद नाही. मृत्युला सगळे सारखेच. एक समान.

बऱ्याच कवींना ह्या गूढ़ प्राण्याचे प्रचंड आकर्षण वाटले आहे. भाऊसाहेब पाटणकर म्हणतात-
"कफ़न माझे दूर करूनी, पाहिले मी बाजुला
एकही आसू कुणाच्या डोळ्यात ना मी पाहिला
बघुनी हे माझेच आसू, धावले गालावरी
जन्मभर हासूनही मी, रडलो असा मेल्यावारी"

आणि म्हणुनच मला वाटते की बोले तैसा चालणारा, माणसाला माणूस बनवून ठेवणारा तो मृत्यु कितीही भीषण वाटला तरीही तो तितकाच खरा मित्र पण आहे...

सरळ साधे http://mymarathiwork.blogspot.com/

Saturday, March 30, 2013

माझा शिवबा - छत्रपती शिवाजी महाराज... Chhatrapatee Shivajee Maharaj

Chhatrapatee Shivajee Maharaj

One who created independent self government from scratch by the sweat of his brow, against strongest (in every sense from treasury to arm forces) of the enemies (Mughalshahi, Nijamshahi, Aadilshahi and loads of his own people) when they were at the pick of their strength...

One who lost all of his empire he has earned in 20 years in 4 months BUT resurrected it again with thousand fold of glory...

One who was arrested in Agra by the strongest mughal emperor- Aurangzeb, BUT managed to escape from crocodile's jaw with one of the best vanishing act history has ever seen...

One who fought hundreds of battles BUT did not burden common man with any extra tax...

One who appreciated importance of naval forces unlike his contemporaries, after around 600 years and created his own naval force (don't forget his introduction of this new industry in coastal area)...

One who not only focused on spread of his empire BUT who took care of his people as a mother with strong and we'll laid and managed administration...

One,in whose empire women could roam around at 12 o'clock at night without any fear (which has not been possible till date)...

One whose common people fought for about 27 years for his cause even after his death (there are only handful examples in history where common men fought for their self government without any monetary incentive)...

This list is unending, but have to stop somewhere...

Mahatraj (O' King) thanks a ton for these invisible and invincible armour of unbreakable spirit and self confidence...

And for those who celebrated his birth anniversary by treating him like a GOD, through all the show offs (loud music, garlanding his statute etc. etc.) must try to inculcate one of his humanly qualities, At least for one day...

Thursday, March 28, 2013

ओ अप्सरा

तेरे छरहरे बदन की जो गोलाईया हैं,
मदभरे मन की वो अंगडाइयाँ हैं।

ओ सिंहकटी,
तू कहा चली,
तेरे कमर के हिचकोलों पे,
मेरे दिल की गती बढ़ी।

तेर होठोंपे जो अंगूरी हाला हैं,
मेरे प्यासें अधरोंको वो पानी है।

ओ गजगामिनी,
तेरी राह तकि,
तेरे आनेकी आहट से भी,
मेरे दिल की गती बढ़ी।

तेरे नयनोंकी की जो बादामी गेहराइया हैं,
उनमे मेरे आँखों की धुंधली परछाईयाँ हैं।

ओ मृगनयना,
तुमसे नज़र मिली,
तेरी पलकें झुकी,
तो मेरे दिल की गती बढ़ी।

बायको

लग्न झालेले सगळे पुरुष जरी आपापल्या बायकांना माहेरी पाठवण्याच्या मागे असले तरी मनातून प्रत्त्येकाला माहीत असते की तो आता एकटा पडणार आहे. घरातील त्या अतिशय महत्वाच्या स्त्रीची कमतरता फक्त तोच जाणून असतो. वर वर बायकोच्या माहेरी जाण्यावार तो कितीही हसत असला तरीही आतून होणारी घुसमट तो कोणालाही सांगू शकत नाही.

Thursday, February 14, 2013

फुकटचा सल्ला

संसारजलात राहून कमलपत्रासम अलिप्तता साधायची असेल आणि कमालीचा संयम कमवायचा असेल तर - पुण्यात 'गाडी हाका' किंवा 'साडी विका...'

Monday, May 7, 2012

भावनांचे आवेग माझे

भावनांचे आवेग माझे अश्रू होऊन बरसले,
गालावरुनी ओहोळ त्यांचे कुंद मातीत मिसळले.

एकट्याची वाट माझी एकट्याने चाललो,
दो-क्षणांच्या  सोबतीला सुख मानून भाळलो 

वाट काट्यांचीच होती, खाच-खळगे दांडगे,
वर-वरुनी चांगले हे लोक आतून लांडगे

मीच प्रेमाने जनांना आपलेच मानले,
त्याच षंढ माणसांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसले

भावनांचे आवेग माझे अश्रू होऊन बरसले,
गालावरुनी ओहोळ त्यांचे कुंद मातीत मिसळले.

Saturday, April 21, 2012

आता कळले तुला पाऊस आला कशामुळे?

ढगांच्या शाळेतून एक ढग पळाला, 
हा प्रकार काही त्याच्या सरांना नाही कळाला
जणू तो ढग हवेत गेला विरून,
हा पठ्या मात्र आला अख्या आभाळात फिरून

ढगाला जायचे होते बागेत,
किंवा निळ्या तलावातल्या छोट्याश्या नावेत,
वाटले त्याला खाऊ मस्त भेळ, चिंचा आणि बर्फाचे गोळे,
त्यावर पिऊ गार गार गोड गोड शहाळे.

हे सगळे करून ढग चौपाटीवर गेला,
वाळूत लोळून लोळून धुळीत पूर्ण माखला.
चौपाटीवरून निघताना मात्र सरांनी धरला त्याचा कान,
हातावर छडी मारून विचारले, "कशाला मारलीस शाळेला टांग?"
खेळून खेळून झाला आहेस तू काळा-काळा,
आता सांगतो तुझ्या आई-बाबांना कि तू बुडावलीस शाळा...

बिचाऱ्या ढगाचे भरून आले डोळे,
आता कळले तुला पाऊस आला कशामुळे??

पावसात रडत बसू नकोस

पावसात रडत बसू नकोस; पावसात कुढत बसू नकोस,
पावसात कष्टी होऊ नकोस; पावसात दु:खी होऊ नकोस...

प्रत्येक पाऊस असा झेलून घे चेहऱ्यावर,
थेंब अन थेंब मुरून जाऊ दे,
तुझ्या उघड्या निधड्या छातीवर...

पण त्याला कोरडा परत जाऊ देऊ नकोस,
तुझ्या अश्रुंचे पाणी त्याला दे,
आणि देऊन टाक त्याला तुझी दु:खे...

घेऊन जाऊ दे ते सगळे त्याला कोठेतरी दूर,
बरसून बरसून तोही होईल मोकळा,
आणि तूही होशील मोकळा, ओला चिंब...

लहानपणीचा पाऊस (लेख की कविता?)

आजचा प्रवास मी पावसाला वाहिला,
भर रस्त्यात पावसाच्या आठवणींचा सदा पडलेला पहिला

शाळेत असतानाचा पाऊस खेळण्यासाठीच यायचा,
म्हणूनच जेव्हा जेव्हा मला लहानपणीचा पाऊस आठवतो,
तेव्हा तेव्हा मी त्याच्या बरोबर खेताना आणि भिजतानाच दिसतो
घाण पाण्यात खेळताना, चिखलात उड्या मारताना...
पाठीवरच्या दप्तराचे ओझे तोच वाहायचा बहुतेक,
मग यायची पावसाळ्यातली सुट्टी,
पावसाने मिळवून दिलेली किंवा आपण होऊन शाळेला मारलेली बुट्टी...

आजचा प्रवास मी पावसाला वाहिला,
लहानपणीच्या आठवणीनी माझ्याभोवती मस्तपैकी घेर धरला...
माझ्या बरोबर पाऊस चिखलात खेळला,
नंतरचा ओरडाही माझ्याबरोबरच खाल्ला...

माझ्या बरोबर तो हुंदड-हुंदड हुंदडला,
शाळेला बुट्टी मारून माझ्या बरोबरच अंथरुणात लोळला,
म्हणूनच आजचा प्रवास मी पावसाला वाहिला...

Friday, March 2, 2012

पाऊस पडावा...

पाऊस पडावा रिमझिम रिमझिम,
त्यात सुटावा गंधित वारा
ओल्या रस्त्यांवारूनी फिरतो,
आठवणींचा तो ऋतू हिरवा.

पाऊस पडावा धोधो धोधो,
काही न दिसावे डोळ्यांपुढती.
जलधारांचा प्रचंड पडदा,
जणू तटाच्या उंचच भिंती.


पाऊस पडावा धुक्यामधुनी,
शुभ्र ढगांची गर्दी व्हावी,
ह्या धुक्यातच दडून जावी,
दूर-दूरची पर्वतराजी.


पाऊस पडावा उघडीप उघडीप,
पाण्यामध्ये ऊन वितळावे,
अन थेंबानी अवचित असे,
इंद्रधनुच्या पुढ्यात यावे.

पाऊस पडावा गर्जत गर्जत,
विजांविजातच भांडण व्हावे,
वादळ वाऱ्यानीच तेह्वा

ऋतूराजाचे स्वागत व्हावे

पाऊस पडावा भल्या पहाटे,
आणि क्षणभर त्याने थांबावे.
ह्या विश्रांतक्षणीच त्याने,
कमालदलावर मोती व्हावे...