Showing posts with label i.q.. Show all posts
Showing posts with label i.q.. Show all posts

Tuesday, October 20, 2015

खरा बिग बॉस

काल बायको बिग बॉस बघत असताना मी तिला विचारलं,
"काय ग, ह्या बिग बॉसच्या घरात जाणाऱ्यांचा I.Q. तपासतात का कधी?"
उत्तरादाखल एक जळजळीत कटाक्ष मिळाला.
"जाणाऱ्यांचा जाऊ दे पण पाहणाऱ्यांचा I.Q. तरी...?"
उत्तरादाखल एक ........ जाऊ दे. घरातल्या गोष्टी कशाला बाहेर सांगा.

असो. तर तेव्हा मला कळलं की घरातला खरा 'बिग बॉस' कोण ते! मीच आता बिग बॉसचे घर शोधत आहे. बिग बॉसच्या कट्टर फॅनला (आणि त्यात सुद्धा स्वतःच्या बायकोला) असा प्रश्न विचारून माझ्याच low I.Q. चा अर्थात मुर्खपणाचा पुरावा सादर केला. कदाचित त्या निकषावर बिग बॉस घरात घेतीलही.

आणि तसं बघायला गेलं तर बिग बॉसचा अजुन दूसरा कुठला Selection Criteria असेल असं वाटत तरी नाही...