Showing posts with label Religion. Show all posts
Showing posts with label Religion. Show all posts

Wednesday, October 14, 2015

देवधर्म

आचार विचार
टाकला गहाण
आंधळी वणवण
फुकटची

रात दिनी चिंता
काळज्या वहाव्या
लागती, दैना
आयुष्याची

ह्याच्या मागे कोण
आहे कर्ता-करवीता
सांगती धर्म सारे
बोम्बलून

देव माणसाचा की
माणूस देवाचा
ह्याचा विचार
कोणीही ना करी

धर्म आपापले
आवडती सगळ्यांना
दुसऱ्या धर्माचे
आम्हाला वावडे

माझा तोच देव
माझा तोच धर्म
दुसऱ्याचे ते
पापी करंटे कारटे

जिथे कुठे आहेस, देवा
दडून बसला
असा सामोरी ये ना
जगासाठी

आला आवाज वरून

"माणसाची रे लेकरं
माझी रुपेच आहेत
आरशात स्वतःला
नीट पाहून घे ना

कशा फुका चालवला
हा सावळा-गोंधळ
माणसातच देव-धर्म
तुम्ही कवळावा...